चिपळूण (प्रतिनिधी): पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आजारांचे वेळेत निदान होऊन नागरिकांना योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने चिपळूण येथील अपरांत मल्टीस्पेशालिटी अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे १५ जुलै ते २५ जुलै या कालावधीत विशेष पावसाळी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये केवळ ₹२५० मध्ये तज्ज्ञ फिजिशियन यांचे मार्गदर्शन, रक्तदाब तपासणी, ऑक्सिजन (SpO₂) तपासणी, वजन व BMI मोजणी तसेच ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे आदी पावसाळी आजारांबाबत वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. तसेच शिबिरासाठी नोंदणी केलेल्या रुग्णांसाठी ईसीजी (ECG) व रक्तशर्करा तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
शिबिरादरम्यान सोनोग्राफी, एक्स-रे, सीटी स्कॅन तसेच विविध रक्त तपासण्यांवर २० टक्क्यांपर्यंत विशेष सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय व्हायरल ताप, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, पोटाचे विकार, सर्दी-खोकला, न्यूमोनिया, त्वचारोग तसेच सांधेदुखी व अस्थिरोग यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष सल्ला व उपचार उपलब्ध राहणार आहेत.
अपरांत हॉस्पिटलमध्ये अनुभवी फिजिशियन, जनरल सर्जरी, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग व त्वचारोग विभागांसह अत्याधुनिक आयसीयू, आधुनिक निदान सुविधा आणि २४x७ आपत्कालीन सेवा उपलब्ध आहेत. कार्यक्षम कर्मचारीवर्ग व रुग्णकेंद्रित सेवेमुळे या हॉस्पिटलने नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी हॉस्पिटलकडून विशेष कूपनचे वितरण चिपळूण शहर व परिसरात वृत्तपत्रांद्वारे तसेच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. शिबिराचा लाभ घेताना संबंधित कूपन सोबत आणणे आवश्यक आहे. अनावधानाने कूपन मिळाले नसल्यास ते हॉस्पिटलच्या स्वागत कक्षात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या विशेष पावसाळी आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अपरांत मल्टीस्पेशालिटी अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.अधिक महितीसाठी:7998898989/7998737373(02355-254345/254254 किंवा aparantoffice@gmail.com/www.aparanthospital.com या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा.
