चिपळूणच्या डॉ. शमीना परकार यांची लायन्स क्लबच्या ‘झोन चेअरमन’ पदी निवड

Gramin Varta
72 Views

चिपळूण: सामाजिक क्षेत्रात आपल्या निस्वार्थ सेवेने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. शमीना परकार यांची लायन्स इंटरनॅशनलच्या ‘झोन चेअरमन’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०१७ पासून लायन्स क्लबशी जोडल्या गेलेल्या डॉ. परकार यांनी आपल्या कार्यकाळात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात केलेल्या विशेष कामामुळे अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे.

लायन्स क्लब ऑफ चिपळूणचे नाव उंचावण्यात त्यांचा मोलाचा वाटा असून, चिपळूणमधील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांना ‘माणुसकीचा झरा’ म्हणून ओळखले जाते. जिल्हा परिषदेच्या शाळांना शैक्षणिक साहित्याची मदत करणे, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण देणे आणि कोरोना व महापुरासारख्या संकटकाळात मदतीचा हात पुढे करणे, अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे. या नव्या जबाबदारीत त्या ‘रिजन ५ झोन १’ अंतर्गत सहा क्लबच्या कार्याचे नेतृत्व करणार आहेत. क्रीडा क्षेत्रातील आवड आणि फिटनेसबाबत जागरूक असलेल्या डॉ. परकार यांच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या निवडीमध्ये एमजेएफ डॉ. ला. निलेश पाटील आणि एमजेएफ चेतना होळकर यांच्या मार्गदर्शनाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या वडिलांचा राजकीय व सामाजिक वारसा आणि कुटुंबाचे खंबीर पाठबळ यामुळेच हे यश गाठणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

Total Visitors :
4576953
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *