लांजा: दिव्यांग बांधवाच्या मदतीसाठी दिव्यांग जनकल्याण संस्था सरसावली; अक्षय मेस्त्री यांना दिव्यांग प्रमाणपत्र आणि ई-केवायसीचा लाभ

Gramin Varta
378 Views

लांजा: लांजा तालुक्यातील ईसवली सुतारवाडी येथील अंथरुणाला खिळलेल्या अक्षय अनिल मेस्त्री या दिव्यांग बांधवाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांग जनकल्याण संस्थेने मोलाची भूमिका बजावली आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वैयक्तिक पुढाकार घेऊन अक्षय मेस्त्री यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून दिली, ज्यामुळे आता त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अक्षय मेस्त्री यांची शारीरिक स्थिती गंभीर असल्याने त्यांना स्वतःहून कार्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन दिव्यांग जनकल्याण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना स्वखर्चाने रत्नागिरीला नेले आणि आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळवून दिली. त्यानंतर १ जुलै रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या संवेदनशील कामगिरीमुळे संस्थेच्या अध्यक्ष संजय सुर्वे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

या मोहिमेत दिव्यांग जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे यांच्यासह जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे तालुका अध्यक्ष योगेश पांचाळ, संस्थेचे उपसचिव किरण वाघरे, सहखजिनदार शेखर चाळके आणि सदस्य संजय कुडकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना तत्काळ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी संस्थेचा हा पुढाकार अत्यंत दिलासादायक ठरला आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4826799
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *