शेतीतील लावणीच्या कामासाठी लवकर उठवल्याने सुनेकडून सासूला मारहाण, चिपळुणात गुन्हा

Gramin Varta
657 Views

चिपळूण : शेतीतील लावणीच्या कामासाठी लवकर उठण्यास सांगितल्याच्या कारणावरून सुनेने सासूला मारहाण करून जखमी केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील रेहेळ गावणवाडी येथे शनिवारी (११ जुलै) सकाळी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात सुनेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सवर्णा कृष्णा नाचरे (वय ७१, रा. रेहेळ, गावणवाडी, ता. चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. त्या घरी असताना त्यांनी मुलगा दर्शन व सून मयुरी दर्शन नाचरे यांना, “लावणीचे दिवस असल्याने लवकर उठा, अन्यथा शेतीची कामे कशी होणार,” असे सांगितले. या बोलण्याचा राग मनात धरून सून मयुरी हिने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

यानंतर चुलीजवळ ठेवलेल्या लाकडी फाट्याने सासूच्या डोक्यावर व उजव्या हातावर मारहाण करून त्यांना दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Total Visitors :
4827846
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *