चिपळूण: विहिरीत आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह; सावर्डे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

Gramin Varta
331 Views

चिपळूण : तालुक्यातील पालवण येथील ढोरपाल परिसरातील एका विहिरीत बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रियांका गजानन चव्हाण (वय ५२, रा. पालवण साठलेवाडी, ता. चिपळूण) असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात १८ जुलै २०२६ रोजी दुपारी १.५९ वाजता करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका चव्हाण या १५ जुलै २०२६ पासून बेपत्ता होत्या. त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत सावर्डे पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती (नापत्ता रजि.नं. १०/२०२६). १५ जुलै रोजी पहाटे ३ वाजल्यापासून १८ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्याच्या दरम्यानच्या काळात ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पालवण येथील ढोरपाल परिसरातील विहिरीत त्यांचा मृतदेह सापडल्याने सावर्डे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी एएमआर क्र. १३/२०२६ नुसार बी.एन.एस.एस. १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitors :
4576146
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *