ब्रेकिंग: डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमएचा बंद स्थगित

Gramin Varta
187 Views

रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द केल्यामुळे घेतला निर्णय

मुंबई: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पुकारलेला 24 तासांचा राज्यव्यापी वैद्यकीय सेवा बंद मुंबई उच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी डॉक्टरांना मारहाण तसेच परिचारिकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आयएमएने केली होती.दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेला जामीन रद्द केला. न्यायालयाने म्हात्रे यांना रविवारी संध्याकाळपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे निर्देश दिले.रुग्णसेवा बंद राहिल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आयएमएला संप मागे घेण्याचे आवाहन केले. न्यायालयाच्या सूचनेचा मान ठेवून आयएमएच्या राज्य शाखेने सोमवारपासून प्रस्तावित 24 तासांचा बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र आरोग्य सेवा संरक्षण कायदा अधिक कठोर करावा, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या आयएमएने सरकारकडे केल्या आहेत.आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई आणि राज्य खजिनदार डॉ. अमोल गित्ते यांनी सांगितले की, शासनाने मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आगामी 9 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल.डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले थांबवण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची गरज असल्याचे आयएमएने स्पष्ट केले.

Total Visitors :
4826802
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *