चिपळूण तालुका युवती अधिकारीपदी तीर्था मंदार लाड; शिवसेनेकडून सत्कार करून शुभेच्छा

Gramin Varta
117 Views

चिपळूण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिपळूण तालुका युवती सेनेच्या “तालुका युवती अधिकारी” पदावर तीर्था मंदार लाड यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यानिमित्त त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नव्या जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदन करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ही नियुक्ती तीर्था लाड यांच्या पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि सातत्यपूर्ण कार्याची पोचपावती असल्याचे सांगितले. युवती सेनेच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, युवक-युवतींचा पक्षातील सहभाग वाढविणे आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांना अधिक गती देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भगवा विचार अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नव्या नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या सत्कार समारंभास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, शहर सचिव प्रशांत मुळये, उपतालुका प्रमुख सचिन शेट्ये, विभाग प्रमुख अजित गुजर, मंदार लाड तसेच प्रमोद आग्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी तीर्था मंदार लाड यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत संघटन अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्या कार्यास यश लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

Total Visitors :
4584976
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *