संगमेश्वर तालुका जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर

Gramin Varta
125 Views

संगमेश्वर : तालुका जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची नवनिर्वाचित कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये तालुकाध्यक्षपदी मनिष जाधव, तालुका सचिवपदी वैभव जाधव तर तालुका कोषाध्यक्षपदी निलेश पिळणकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमेश्वर येथे ही निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीवेळी राज्य कार्यकारिणी सदस्य गजानन साळुंखे, जिल्हा कोषाध्यक्ष विवेक गावडे, आरोग्य सहाय्यक संदीप खेडसकर, विनोद शिंदे, आरोग्य सेवक शिवराज शेट्ये, संतोष भोसले, विश्वनाथ घाणेकर, सुमेध यादव, राजेंद्र घाणेकर, आरोग्य सेविका श्रीमती तेजस धुमक, श्रीम. डी. एस. सांडीम तसेच हिवताप कर्मचारी संघटनेचे संजय मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी संघटना भक्कमपणे उभी असून, त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिरारक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची भूमिका यावेळी मांडली. या निवडीमुळे संगमेश्वर तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विविध स्तरांतून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :
4584975
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *