आयकर रिटर्न भरण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक; अंतिम मुदत 31 जुलै

Gramin Varta
108 Views

मुंबई: आयकर भरणाऱ्या करदात्यांसाठी आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणे अनिवार्य आहे. आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करण्याची अंतिम तारीख आता अत्यंत जवळ आली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 (मूल्यांकन वर्ष 2026-27) साठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे.आयटीआर दाखल करण्यासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक आहेत.

आयकर विभागाने शनिवारी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका. मूल्यांकन वर्ष 2026-27 साठी आपला आयटीआर-1 आणि आयटीआर-2, 31 जुलै 2026 पूर्वी दाखल करा. विभागाने म्हटले आहे की, https://incometax.gov.in या संकेतस्थळावर जाऊन कोणताही दंड न भरता 31 जुलैपूर्वी आपला आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करा.

आयकर विभागाने म्हटले आहे की, बहुतांश पगारदार आणि वैयक्तिक करदात्यांनी 31 जुलैची अंतिम मुदत टाळण्यासाठी अधिकृत इनकम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन आपला रिटर्न निश्चितपणे दाखल करावा. जर आपण 31 जुलैची अंतिम मुदत चुकवली, तर आपल्याकडे विलंबित रिटर्न (बिलेटेड रिटर्न) दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध राहतो. मात्र, उशीर झाल्यास दंड, अतिरिक्त व्याज तसेच अनेक करसवलती गमवाव्या लागू शकतात.

विशेष म्हणजे, आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 139(4) अंतर्गत, जे करदाते नियोजित मुदतीपर्यंत रिटर्न दाखल करू शकत नाहीत, ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत किंवा मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी आपला विलंबित रिटर्न (बिलेटेड रिटर्न) दाखल करू शकतात.

Total Visitors :
4844062
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *