‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घेऊन येत आहे ‘कॉमेडीचं फाइव्हजी’

Gramin Varta
40 Views

मुंबई: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतल्या प्रेक्षकांना गेली आठ वर्षं खळखळून हसवणारी, प्रत्येक कुटुंबाचा अविभाज्य भाग झालेली आणि मराठी दूरचित्रवाणीवरच्या सर्वाधिक लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांपैकी एक असलेली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाली आहे.

‘ऑगस्ट महिन्यात सोनी मराठी वाहिनीवरची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आपल्या आठ वर्षांच्या यशस्वी प्रवासाच्या उंबरठ्यावर पोहोचत आहे.’ या अविस्मरणीय प्रवासात एक हजारहून अधिक भाग आणि सुमारे तीन हजारहून अधिक भन्नाट स्किट्स सादर करत हास्यजत्रेनं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नं प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन केलं नाही तर मराठीतल्या अनेक गुणी कलाकारांना घराघरांत पोहोचवून लोकप्रियता मिळवून दिली. समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, चेतना भट, ॐकार राऊत, प्रभाकर मोरे, वनीता खरात, ॐकार भोजने इत्यादी कलाकारांनी आपल्या अफलातून विनोदी शैलीनं आणि अचूक कॉमिक टायमिंगनं प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या भन्नाट व्यक्तिरेखांमुळे आणि संस्मरणीय स्किट्समुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आज प्रत्येक मराठी घरातील आनंदाचा आणि कौटुंबिक मनोरंजनाचा अविभाज्य भाग आहे.

प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवं, वेगळं आणि अधिक मनोरंजक देण्याची परंपरा ‘सोनी मराठी’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांनी कायम जपली आहे. प्रेक्षकांच्या भरभरून प्रेमामुळे आणि त्यांच्या वाढत्या मागणीमुळे यंदा हास्यजत्रा आणखी एका मोठ्या बदलासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

१० ऑगस्टपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – कॉमेडीचं फाइव्हजी’ या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. आता हा कार्यक्रम आठवड्यातले तब्बल पाच दिवस – सोमवार ते शुक्रवार, रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे नव्या भागासाठी आता पुढच्या आठवड्याची वाट पाहण्याची गरज नाही. दररोज नव्या भागासह, नव्या स्किट्ससह नवी धमाल आणि खळखळून हसवणारे क्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. फाइव्हजीच्या स्पीडनं होणार आहे सुपरफास्ट कॉमेडी.

‘कॉमेडीचं फाइव्हजी’ ही या पर्वाची केवळ संकल्पना नसून मनोरंजनाचा नवा वेग आहे. अधिक दिवस, अधिक स्किट्स, अधिक धमाल आणि अधिक हशा… म्हणजेच मनोरंजनाचा फुल्ल स्पीड…! आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या हास्याचा हा सुपरफास्ट प्रवास आठवड्याचे पाचही दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

तेव्हा तयार राहा. धामधूम, मजामस्ती यांबरोबरच सुपरफास्ट कॉमेडीच्या मेजवानीसाठी पाहा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – कॉमेडीचं फाइव्हजी’ १० ऑगस्टपासून, सोमवार ते शुक्रवार, रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनी आणि सोनी लिव्ह वर.

Total Visitors :
4656122
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *