दापोली नगरपंचायतीकडून क्रांतीदिनानिमित्त क्रांतिकारकांना आदरांजली

Gramin Varta
34 Views

दापोली : नगरपंचायत येथे ९ ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून प्रांगणातील क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि सविस्तर पार पडला. यावेळी उपस्थितांनी क्रांतीस्तंभाला पुष्पहार अर्पण करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांना आदरांजली अर्पण केली. या कार्यक्रमा प्रसंगी दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. कृपा घाग, आरोग्य सभापती सौ. जया साळवी, प्रशासकीय अधिकारी श्री. सारंग कुलकर्णी तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री. किशोर देसाई, स्वातंत्र्य सैनिक श्री. श्रीकृष्ण पेठे, स्वातंत्र्य सेनानी श्री. भगतसिंग फाटक यांचे सुपुत्र डॉ. शिरीष फाटक, स्वातंत्र्य सेनानी शिवराम मुरकर यांचे सुपुत्र श्री. विजय मुरकर, सैन्य दलतून निवृत्त झालेले श्री. राजेन्द्र शिगवण यांच्यासह दापोली शहरातील नागरिक आणि नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून नगराध्यक्षा सौ. कृपा घाग यांच्याքतर्फे प्लास्टिक पिशवीमुक्त दापोली या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले, ज्यायोगे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

Total Visitors :
4671916
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *