संगमेश्वर : रायवळ आंबा रोपण ग्रुपच्या वतीने रायवळ आंब्याची लागवड

Gramin Varta
52 Views

संगमेश्वर: संगमेश्वर-देवरूख येथील रायवळ आंबा रोपण ग्रुपतर्फे संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयाच्या परिसरात रायवळ आंब्याची लागवड करण्यात आली.

पर्यावरण संवर्धनाबरोबरच रायवळ आंब्याच्या देशी वाणाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी विविध ठिकाणी रायवळ आंब्याची लागवड केली जाते.

यापूर्वी संगमेश्वर तालुक्यात नवले येथील ग्राममंदिर परिसर तसेच मुचरी-तेरे परिसरात रायवळ आंब्याची लागवड करण्यात आली आहे. त्याच उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून नवनिर्माण महाविद्यालयाच्या परिसरात रायवळ आंब्याची रोपे लावण्यात आली.

यावेळी रायवळ आंबा रोपण ग्रुपचे मिलिंद संसारे, उदय संसारे, विलास प्रसादे, विनय प्रसादे, विजय पवार, सौ. जयश्री प्रसादे, शिवांगी प्रसादे यांच्यासह नवनिर्माण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संजना चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

रायवळ आंब्याच्या देशी वाणाचे संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

महाविद्यालय परिसरात आंब्याची लागवड झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही पर्यावरण संवर्धन आणि देशी वृक्षांच्या जतनाबाबत जागृती निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Total Visitors :
4697069
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *