बोटीवर फिट आली; समुद्रात पडून कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
58 Views
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

रत्नागिरी : जहागीर आदम मुल्ला यांच्या बोटीवर काम करणाऱ्या प्रौढ व्यक्तीला बोटीवरच अचानक फिट आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

प्रकाश दत्ताराम साळवी (४८, रा. नेवरे बाजारपेठ, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी घडली.

बोटीवर काम करत असताना प्रकाश साळवी यांना अचानक फिट आली. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या घटनेमुळे साळवी यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Total Visitors :
4702699
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *