खेड येथे सिंधुरत्न समृद्ध योजना २.० आढावा बैठक संपन्न

Gramin Varta
23 Views

खेड : रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देतानाच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खेड नगर परिषद सभागृहात आढावा बैठक पार पडली. या योजनेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण विकासात्मक उपक्रम राबवून जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सिंधुरत्न कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी यावेळी सांगितले.

१८ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ला मंजुरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खेड येथे आयोजित बैठकीत योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा आणि विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील विकासाला चालना देणे, रोजगाराच्या संधी वाढविणे आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून आर्थिक प्रगती साधणे, या दृष्टीने ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या बैठकीला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा अल्पसंख्याक सेल खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्ष आशा सनगरे, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजपा युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीस अभिलाष डंबे, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत भालेकर, भाजपा खेड शहर शक्तिकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष महेश तटकरे, अमोल भोबस्कर, भाजपा प्रणित रिक्षा सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, भाजपा सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रशांत बारटक्के यांच्यासह भाजपा, युवा मोर्चा आणि महिला मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Total Visitors :
4712250
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *