लांजा :भांबेडच्या पोलीस पाटिलांचा  प्रामाणिकपणा;हरविलेले पाकीट मालकाच्या स्वाधीन

Gramin Varta
384 Views

पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे यांनी केला सत्कार

लांजा/अरबाज नेवरेकर:-प्रवासादरम्यान हरविलेले पाकीट सापडल्यानंतर ते प्रामाणिकपणे संबंधित मालकाच्या ताब्यात देणाऱ्या भांबेडचे पोलीस पाटील वसंत सीताराम शिवगण यांचा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

अनिल टोलू पवार (वय ५८, आर्मीमधून सेवानिवृत्त, रा. सिंगापूर, ता. संगमेश्वर) हे १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास साडवली येथे प्रवास करीत असताना त्यांचे पाकीट हरविले होते.

दरम्यान, भांबेडचे पोलीस पाटील वसंत सीताराम शिवगण हे कामानिमित्त संगमेश्वर येथे गेले असता त्यांना हे पाकीट सापडले. पाकीट मिळाल्यानंतर त्यांनी ते स्वतःकडे न ठेवता त्याच्या मालकाचा शोध घेतला.

बुधवार, १९ ऑगस्ट रोजी अनिल टोलू पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांचे हरविलेले पाकीट सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पाकीट परत मिळाल्याने पवार यांनी समाधान व्यक्त केले.

हरविलेली वस्तू प्रामाणिकपणे परत करण्याच्या पोलीस पाटील वसंत शिवगण यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाची दखल घेत पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

Total Visitors :
4723682
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *