वांद्री गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी राजेश हळदणकर यांची बिनविरोध निवड

Gramin Varta
27 Views

ग्रामसभेत एकमताने निर्णय; सामाजिक कार्याची दखल घेत ग्रामस्थांचा विश्वास

वांद्री : वांद्री गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते राजेश हळदणकर यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली. गावातील सामाजिक कार्य, नागरिकांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि गावाच्या हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांच्या नावाला एकमताने पसंती दिली.

वांद्री येथे झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी राजेश हळदणकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यांच्या नावाला ग्रामस्थांनी एकमताने समर्थन दिल्याने कोणतीही निवडणूक न घेता त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे राजेश हळदणकर यांना यापूर्वीही तंटामुक्त अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. गावामध्ये सामाजिक सलोखा, आपसी वाद सामोपचाराने मिटविणे आणि ग्रामस्थांमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी त्यांनी यापूर्वीही काम केले आहे.

तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील किरकोळ वाद-विवाद न्यायालयीन प्रक्रियेत न जाता परस्पर सामंजस्याने सोडविणे, सामाजिक शांतता व बंधुभाव कायम ठेवणे तसेच गावात सलोख्याचे वातावरण निर्माण करणे, ही महत्त्वाची जबाबदारी अध्यक्ष म्हणून राजेश हळदणकर यांच्यावर राहणार आहे.

- Advertisement -

ग्रामसभेने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत बिनविरोध निवड केल्याने ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात गावातील सामाजिक सलोखा अधिक मजबूत करण्यासाठी तंटामुक्त समिती प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Total Visitors :
4776672
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *