रत्नागिरी : मुस्लिम समाज विकास संघ जिल्हा रत्नागिरीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. लांजा तालुका प्रतिनिधी अकील नाईक यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेचे अध्यक्ष मुराद अडरेकर व सचिव महमंद हुसैन मूसा यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस अकील नाईक यांच्यासह रत्नागिरीतील प्रतिष्ठित मोहसीन अ. करीम मुल्ला, अ. समद अ. कुद्युस सोलकर, नाझीम हसनमियां मजगांवकर, सलमान रऊफ हाजू व सुहेल रफीक लाला उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मुराद अडरेकर व सचिव महमंद हुसैन मूसा यांनी मुस्लिम समाज विकास संघ जिल्हा रत्नागिरीच्या ध्येय-उद्दिष्टांची तसेच आजपर्यंत करण्यात आलेल्या सामाजिक कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचारांचे आदानप्रदान झाले. संस्थेच्या ध्येय-उद्दिष्टांना अनुसरून सामाजिक कार्याला नवी दिशा देण्याबाबत आश्वासक चर्चा करण्यात आली. संस्थेच्या सामाजिक विचारांशी सहमत होत उपस्थितांनी संस्थेचे आजीव सभासदत्व स्वीकारले.
दरम्यान, कार्यकारी मंडळाच्या पुढील सभेत यापैकी दोघांची रत्नागिरी तालुक्यातील संस्थेचे ‘प्रतिनिधी’ म्हणून निवड करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी यावेळी दिली.
बैठकीत सामाजिक कार्याच्या विस्तारासह संस्थेच्या आगामी वाटचालीबाबत सकारात्मक चर्चा झाली. संपूर्ण बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
मुस्लिम समाज विकास संघ जिल्हा रत्नागिरीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
Leave a Comment






