कपडे धुत असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली; खेडमध्ये दोघांवर गुन्हा

Gramin Varta
53 Views

खेड : घरात कपडे धुत असलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन संगनमताने हिसकावून पळवून नेल्याची घटना खेड तालुक्यातील भिलारे आयनी, खोंडेवाडी येथे १ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या प्रकरणी खेड पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सविता तुकाराम तांबट (वय ६५, व्यवसाय गृहिणी) या १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी कपडे धुवत होत्या. यावेळी निलेश तुकाराम तांबट (वय ३०) आणि संदीप शिवराम शिंदे (वय ४३), दोघेही रा. भिलारे आयनी, खोंडेवाडी, यांनी संगनमत करून तांबट यांच्या गळ्यातील सोन्याची चैन त्यांच्या संमतीशिवाय ओढून तोडली आणि चैन घेऊन तेथून पळ काढला.

या घटनेत सुमारे १० ग्रॅम वजनाची २२ कॅरेट शुद्धतेची सोन्याची चैन चोरीस गेली असून तिची किंमत अंदाजे १ लाख २० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३६ वाजता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८१/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4802275
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *