चिपळूण : तालुक्यातील खेर्डी येथील मेरीमाता स्कूलमध्ये वर्ग सुरू असताना अचानक श्वास घेण्यास त्रास झालेल्या ४२ वर्षीय शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अस्मिता अजित चौधरी (रा. मार्कडी, चिपळूण) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.
अस्मिता चौधरी या खेर्डी येथील मेरीमाता स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. गुरुवारी (१० सप्टेंबर) सकाळी सुमारे ८ वाजता त्या शाळेत वर्ग घेत असताना अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी मिरजोळी येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद चिपळूण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक ५६/२०२६ अन्वये करण्यात आली आहे. घटनेची नोंद गुरुवारी सायंकाळी ४.४० वाजता करण्यात आली.
चिपळूण: खेर्डीतील शाळेत शिकवताना शिक्षिकेला श्वास घेण्यास त्रास; उपचारादरम्यान मृत्यू
Leave a Comment





