दिल्लीच्या जंतर-मंतरवर CJP च्या आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, परिस्थिती चिघळल्याने परिसरात तणाव

Gramin Varta
154 Views

दिल्ली: दिल्लीत जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन तीव्र रूप धारण करत चिघळले असून, संसदेकडे निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, ज्यामुळे यावेळी आंदोलकांची एकच पळापळ उडाली. दिल्लीत जंतर-मंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, हजारोच्या संख्येने आंदोलक तिथे जमल्यामुळे वातावरण अतिशय तापले आहे आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूची मेट्रो स्टेशनही बंद करण्यात आली आहेत, तसेच इंटरनेट सेवा देखील जॅम केली गेली आहे. नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी प्रमुख मागणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि आंदोलकांची असून, याच मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते.

सोनम वांगचूक यांच्या आमरण उपोषणाला २० दिवस पूर्ण झाले होते, त्यानंतर २१ व्या दिवशी शनिवारी दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी सोनम वांगचूक यांना बळाचा वापर करून उचलत रुग्णालयात दाखल केले, मात्र सोनम वांगचूक हॉस्पिटलमध्ये असले तरी त्यांनी आपले उपोषण सोडलेले नाही. आमचे लक्ष मार्चवर असेल आणि आज तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत असे सांगत, सर्वप्रथम आमचा शांततेत मार्च काढण्याचा प्रयत्न असेल व आपण शिक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करू कारण देशासाठी ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे आणि आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे, असे सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी म्हटले आहे.

Total Visitors :
4564823
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *