खेड : तालुक्यातील उधळे येथील रेल्वे ट्रॅकवर रेल्वेची धडक बसल्याने एका ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पांडुरंग सिताराम भवड (रा. वावे तर्फे नातू, भुवडवाडी, ता. खेड) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हिस्सार एक्सप्रेसने पांडुरंग भवड यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा डावा हात आणि डावा पाय तुटल्याने, तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
Related News
