रत्नागिरी: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा रत्नागिरी जिल्ह्यातील १० बँकांमार्फत १२ हजार ५५४ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यातून ११८ कोटी २२ लाख ५५ हजार ८०८ रुपयांची कर्जमुक्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांनी दिली.
राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने २ जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या योजनेतून रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या कर्जमुक्तीची बँकनिहाय माहिती अशी –
बँक ऑफ इंडिया 3 हजार 425 पात्र खातेदारांची कर्जमुक्ती रक्कम रक्कम 42 कोटी 90 लाख 6 हजार 50, बँक ऑफ महाराष्ट्र पात्र शेतकरी 430 पात्र खातेदारांची रक्कम 15 कोटी 18 लाख 63 हजार, महाराष्ट्र ग्रामीण बँक पात्र शेतकरी 450 पात्र खातेदारांची रक्कम 7 कोटी 44 लाख 60 हजार 191, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पात्र शेतकरी 8 हजार 45 पात्र खातेदारांची रक्कम 30 कोटी 67 लाख 53 हजार 704, फेडरल बँक पात्र शेतकरी 2 पात्र खातेदारांची रक्कम 5 लाख 40 हजार, बँक ऑफ बडोदा पात्र शेतकरी 31 पात्र खातेदारांची रक्कम 84 लाख 89 हजार 371, इंडियन बँक पात्र शेतकरी 3 पात्र खातेदारांची रक्कम 6 लाख 70 हजार, स्टेट बँक ऑफ इंडिया पात्र शेतकरी 15 पात्र खातेदारांची रक्कम 41 लाख 14 हजार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया पात्र शेतकरी 52 पात्र खातेदारांची रक्कम 63 लाख 59 हजार 492, युनियन बँक ऑफ इंडिया पात्र शेतकरी 101 पात्र खातेदारांची रक्कम 20 कोटी.
रत्नागिरी : शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना 118 कोटी माफ
Leave a Comment
