देवरूख पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी राजेंद्र यादव यांची नियुक्ती; लवकरच करणार पदभार स्वीकार

Gramin Varta
119 Views

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून राजेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवरूख पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक उदय झावरे यांना रायगड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी आता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांची वर्णी लागली आहे.

राजेंद्र यादव यांनी यापूर्वी रत्नागिरी ग्रामीण भागात आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ देवरूख परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव लवकरच देवरूख पोलीस ठाण्याचा अधिकृत पदभार स्वीकारणार आहेत. पदोन्नती मिळाल्याबद्दल उदय झावरे आणि नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *