रत्नागिरी: जिल्ह्यातील युवतींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या सौंदर्यासोबतच आत्मविश्वास व व्यक्तिमत्त्वाला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरीत पहिल्यांदाच ‘रत्नागिरी ब्युटी आयकॉन २०२६’ या भव्य सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अनोख्या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील प्रतिभावान तरुणींना आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
या सौंदर्य स्पर्धेमध्ये केवळ बाह्य सौंदर्याचाच नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकास, रॅम्प वॉक, ग्रूमिंग आणि आत्मविश्वास वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या युवतींना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असून, हा अनुभव त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी अत्यंत मोलाचा ठरेल. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसांसह प्रतिष्ठेचा किताब देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख १८ जुलै असून, १९ जुलै रोजी ऑडिशन्स पार पडणार आहेत. यानंतर अंतिम फेरी अर्थात ग्रँड फिनाले ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेत प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला असून, रत्नागिरी आणि परिसरातील इच्छुक युवतींनी ही संधी न दवडता आपले नाव त्वरित नोंदवावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धक अमृता (८४२१३०७७५२), संकेत (९९२१३८९३६२), अमर (८६०००५५५०५) किंवा बझ बूस्टर (८१४९४१६६७५) यांच्याशी संपर्क साधू शकतात. ज्यांच्याकडे आत्मविश्वास आणि स्वप्नांना भरारी देण्याची जिद्द आहे, अशा सर्व तरुणींसाठी हे एक उत्तम दालन खुले झाले आहे.
