‘महाराष्ट्र एप्पस्टीन फाईल’ चित्रपटावरून नवा वाद; रुपाली चाकणकर आक्रमक; जिवंत व्यक्तीची व्यक्तिरेखा पूर्वपरवानगीशिवाय साकारल्याचा दावा

Gramin Varta
137 Views

मुंबई : ‘महाराष्ट्र एप्पस्टीन फाईल’ या आगामी चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. जिवंत व्यक्तीची व्यक्तिरेखा पूर्वपरवानगीशिवाय चित्रपटात साकारण्यात आल्याचा दावा करत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रपटाच्या निर्मात्या-अभिनेत्री दीपाली सय्यद तसेच दिग्दर्शकांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

रुपाली चाकणकर यांनी याप्रकरणी संबंधितांना कायदेशीर नोटीस देण्याची तयारी सुरू केली असून, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांची प्रतिमा आणि व्यक्तिरेखा वापरण्यात आल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे.याच प्रकरणात सुषमा अंधारे, अंजली दमानिया, आशा मिर्जे आणि रुपाली ठोंबरे यांच्याविरोधातही दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या वादामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली असून, पुढील कायदेशीर घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *