जांभरूण शाळेच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम: योग दिनानिमित्त कातळशिल्प संवर्धनाचा जागर

Gramin Varta
95 Views

रत्नागिरी: आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभरूण क्रमांक-१ च्या विद्यार्थ्यांनी एक अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. शाळेच्या परिसरातील ऐतिहासिक कातळशिल्पांच्या ठिकाणी योगासने करत या विद्यार्थ्यांनी जागतिक योग दिनानिमित्त कातळशिल्पांच्या संवर्धनाचा आणि संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला आहे. कोकणाची सांस्कृतिक ओळख असलेल्या हजारो वर्षे जुन्या या कातळशिल्पांचा ठेवा जपण्याची जबाबदारी समाजाची आहे, हे या चिमुरड्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.

कोकणातील काही निवडक गावांमध्ये आढळणारी ही कातळशिल्प देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. या ऐतिहासिक वारशाचे रक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. या विशेष उपक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय कदम, शिक्षक संतोष रावणंग आणि यास्मिन कोतवाल यांच्यासह सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *