कोकणातील ग्रामीण जीवनावर आधारित ‘झिरो झाले हिरो’ वेब सिरीज ४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला

Gramin Varta
256 Views

पाचल/ अंकुश पोटले: कोकणातील ग्रामीण जीवन, मैत्री, संघर्ष आणि निखळ मनोरंजनाचा अनोखा संगम असलेली “झिरो झाले हिरो” ही बहुप्रतिक्षित मराठी वेब सिरीज येत्या शनिवार, दिनांक ४ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता ‘P One Production’ या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित होत आहे. एका सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाची प्रेरणादायी आणि मनोरंजक कथा या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार असून, याबाबत रसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या मालिकेचे संपूर्ण चित्रीकरण कोकणातील पाचल येथील करक गावात अत्यंत नैसर्गिक वातावरणात करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणातील समृद्ध संस्कृती, निसर्ग सौंदर्य आणि गावाकडील अस्सल जीवनशैली प्रेक्षकांना अगदी जवळून अनुभवायला मिळणार आहे. या सिरीजचे कथा आणि दिग्दर्शन परेश राजाराम यांनी केले असून, लेखन प्रकाश भागवत यांनी केले आहे. तसेच पोस्ट प्रोडक्शनची जबाबदारी महेश मटकर यांनी सांभाळली असून डीआय कलरिस्ट म्हणून कैलास पवार यांनी काम पाहिले आहे.

या वेब सिरीजमध्ये अनेक नामांकित आणि स्थानिक कलाकारांच्या दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत. यामध्ये परेश राजाराम, प्रसिद्ध कोकणी रीलस्टार निखिल सकपाळ (कोकणी निखिल), प्रतीक ठोंबरे, ‘येड्यांची जत्रा’ फेम प्रकाश भागवत, टीव्ही कलाकार सचिन देवरुखकर, मंदिरा शिगम, इश्वरी जाधव, किशोर साळुंखे, सुंदर जाधव, अंकुश पोटले, मंगेश नारकर, अस्मिता गांगण, पूजा शिगम आणि यश धावडे या कलाकारांचा समावेश आहे. कोकणातील या दर्जेदार मातीतील कलाकृतीला आणि नवोदित प्रयत्नांना प्रेक्षकांनी भरभरून दाद द्यावी, तसेच युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करत या नव्या मराठी वेब सिरीजला पाठिंबा द्यावा, असे आवाहन निर्मात्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *