GRAMIN SEARCH BANNER

राज्यातील सगळ्याच जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत – उपमुख्यमंत्री

Gramin Varta
25 Views

छत्रपती संभाजीनगर: नैसर्गिक संकटांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे, मात्र त्यांनी अजिबात खचून जाऊ नये. आपलं सरकार त्यांच्या पाठीशी भक्कम उभं आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सगळ्याच जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगर येथे सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रत्येक पालकमंत्र्यांना आपापल्या भागात बारकाईनं लक्ष देण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत केली जाईल, असा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिला.

छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी आमदार श्री. शिवाजीराव चोथे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात जाहीर प्रवेश केला.

शिवाजीरावांचा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव हा नक्कीच जनकल्याणाच्या कार्यात उपयोगी पडेल, असा विश्वास आहे. त्यांच्यासह सर्वांचं मनापासून स्वागत करतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. विकासाच्या वाटेवर चालत असताना सर्व समाजघटकाला सोबत घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या अन्नदाता शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी आम्ही कार्यतत्पर आहोत. असे पवार म्हणाले

Total Visitor Counter

3199545
Share This Article