संगमेश्वर– सह्याद्रि शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी -चिंचघरी सती विद्यालयाचे कलाशिक्षक श्री तुकाराम शिवाजी पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ हा जाहीर झाला आहे .दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना सदर पुरस्कार दिला जातो पण काही तांत्रिक कारणांमुळे सदर पुरस्कार दिनांक १८ सप्टेंबर रोजी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण दिनांक २२ सप्टेंबर रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. कलाशिक्षक टी एस पाटील हे विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात .त्याचबरोबर सदर पुरस्काराच्या निकषाप्रमाणे शालेय विद्यार्थी वाढीसाठी केलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक उठाव, विविध नवोपक्रम, मासिकातील लेखन तज्ञ मार्गदर्शक म्हणून केलेले काम ,त्यांना मिळालेली यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप , तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे बालभारती येथे कार्यानुभव समिती सदस्य म्हणून करत असलेले काम. कलादालन निर्मिती, विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण प्रयोग ,उपक्रम, राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये मिळविलेले यश, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती ,बाहुली नाट्यातून आनंददायी शिक्षण यातून विविध ज्ञानरचनावादावर आधारित विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासाठी उपक्रम ,समाज प्रबोधन, विज्ञान प्रदर्शनातील यश, विविध कला परीक्षातील विद्यार्थ्यांचे यश, शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र चालक म्हणून करत असलेले काम .इत्यादी त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनामार्फत त्यांच्या या शैक्षणिक कार्याचा गौरव केला जाणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्था सावर्डेचे कार्याध्यक्ष चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम , जेष्ठ संचालक शांताराम खानविलकर,सचिव महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार -शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरेकर उपमुख्याध्यापिका सुलोचना जगताप पर्यवेक्षिका सौ आसावरी राजेशिर्के , सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, शालेय समिती सदस्य, विद्यालयाचे सर्व समिती सदस्य, ग्रामस्थ- पालक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कलाशिक्षक टी एस पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
