तुषार पाचलकर/राजापूर : शिवसेनेचे कार्यकर्ते तथा तळवडे गावच्या सरपंच गायत्री साळवी यांचे पती अमित साळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अपूर्वा किरण सामंत फाउंडेशन च्या वतीने तळवडे येथील प्रभावती हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळपासून अतिशय उत्साहात आणि चांगला प्रतिसाद मिळालेल्या
या शिबिराला शिवसेना पाचल विभागप्रमुख शैलेश साळवी,विभाग प्रमुख अमर जाधव,जगदीश उर्फ सोनू पाथरे,विहंग खानविलकर,प्रकाश कुवळेकर दिपक सावंत,अनिकेत ताम्हणकर,सर्वेश,बंधू चिले,अरविंद वरेकर,तसेच पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास सर,उपसरपंच आत्माराम सुतार,तळवडे गावच्या सरपंच सौं.गायत्री साळवी,सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, दुर्वा तावडे असे अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळी दहा वाजता सुरवात झालेल्या रक्तदान शिबिराला एकूण पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले. राजापूर-लांजा मतदार संघातील लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी दुपारी अडीच वाजता शिबिराला भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे स्वीय सहाय्यक परेश खातू व रमजान गोलंदाज यांनी सुद्धा रक्तदान केले.
या शिबिराच्या अनुषंगाने छत्री वाटपाचा यशस्वी कार्यक्रम झाला.
यावेळी पाचल विभागासाठी माननीय आमदार किरण भैया सामंत यांच्या माध्यमातून ॲम्बुलन्स देण्यात आली होती त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यशस्वी झालेल्या या रक्तदान शिबिरात पहिला रक्तदान करण्याचा पहिला मान पाचल चे युवा उद्योजक जगदीश उर्फ सोनू पाथरे यांना मिळाला.