रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे भक्ती मयेकर खून प्रकरण आणि जयगड पोलीस स्थानक हद्दीतील दोन खुनाची प्रकरणे उघड केल्याबद्दल रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार वायचळ, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलिस हेडकॉन्स्टेबल वैभव शिवलकर, अमित पालवे, पंकज पडेलकर, यांचा कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी गुरुवारी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. संजय दराडे गुरुवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पोलीस दलाचा आढावा घेतला व ऑगस्ट महिन्यातील रत्नागिरी घडलेल्या खुनाचा योग्यरित्या तपास केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक बीबी महामुनी पोलीस उपाधीक्षक राधिका फडके व अन्य पोलीस अधिकारी व अंमलदार या ठिकाणी उपस्थित होते.
विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्याकडून रत्नागिरी शहर पोलिसांना प्रमाणपत्र
