GRAMIN SEARCH BANNER

जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्थेतर्फे माखजन येथे मोफत वह्या वाटप

Gramin Varta
58 Views

माखजन :-संगमेश्वर  तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन,व अ‍ॅड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांचे वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.

दरम्यान जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्थेचे सुरु असलेले कार्य संस्थेचे कार्यकर्ते  राजेश धामणे यांनी उपस्थितांसमोर मांडले.संस्थेचे संस्थापक श्री निलेश भगवान सांबरे व कार्याध्यक्ष धीरज सांबरे यांनी शैक्षणिक,समाजिक,वैद्यकीय क्षेत्रात सुरु ठेवलेल्या मोफत कार्याविषयीं राजेश धामणे यांनी उपस्थिताना सांगितले.कोकण सुजलाम,सुफलाम व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ही संस्था अविरत कोकण प्रांतात काम करत असल्याचे श्री धामणे यांनी सांगितले. संस्थेच्या विविध उपक्रमांची दिली.

श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय,रत्नागिरी,संगणक प्रशिक्षण,दरम्यान वह्या वाटपा पूर्वी माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर साठे यांनी जिजाऊ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.यावेळी जिजाऊ कडून राजेश धामणे,स्वरुप सावंत,मनोज पांचाळ आदी उपस्थित होते.विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला ३ वह्या या प्रमाणे सुमारे  अडीच हजार वह्या वाटण्यात आल्या.

कार्यक्रमाला मा.पं.शि.प्र.मंडळ माखजन चे उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सहसचिव दीपक शिगवण,संचालक सुभाष सहस्त्रबुद्धे,मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,गणेश शिंदे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव पोंक्षे याने केले तर आभार अंबादास घाडगे यांनी मानले.

Total Visitor Counter

3366855
Share This Article