देवरुख: देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालय, देवरुख येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘एनएसएस लक्ष्यगीत’ व ‘हम होंगे कामयाब’ या प्रेरणादायी गीतांनी झाली. या गीतांनी सभागृहात देशसेवेची जाणीव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले. यानंतर विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त करत एनएसएस विभागात सहभागी होण्यामागील कारणे, सहभागानंतरचा अनुभव आणि समाजसेवेचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतांमधून सेवा, शिस्त आणि समाजाप्रती जबाबदारीची एनएसएसमधून अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमात एनएसएसचे महत्त्व सांगणारा व्हिडिओ दाखवण्यात आला. या व्हिडिओतून एनएसएसची उद्दिष्टे, युवकांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करण्याची केले जाणारे प्रयत्न आणि सामाजिक बदलासाठी युवा शक्तीची गरज व ताकद याबाबतची प्रभावी माहिती विद्यार्थी स्वयंसेवकांना मिळाली. या कार्यक्रमाला बहुसंख्य प्राध्यापक, एनएसएस स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या एनएसएस दिवसाच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वच्छता, शिस्त आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देण्याचा प्रयत्न यशस्वीपणे साध्य झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, प्रा. मयुरेश राणे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे, प्रा. शिवराज कांबळे, प्रा. आर्य अणेराव यांनी मेहनत घेतली.