GRAMIN SEARCH BANNER

शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत अजीजा दाऊद नाईक हायस्कूलचे  वर्चस्व

Gramin Varta
136 Views

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रीडा  कार्यालयाच्या वतीने १ आणि २ ऑक्टोबर जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत अजीजा दाऊद नाईक हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक तर १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने (३१-१०), १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने (३२-१७) व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने (४६-२२) अशा गुण फरकानी या संघानी प्रथम क्रमांक मिळवले  व हे तीनही संघ  सातारा येथे  होणा-या  कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी  पात्र ठरले.
 
खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.विजयी संघ आणि मार्गदर्शक   मैनुद्दिन भैरेवाडी व शाहनवाज राजापकर यांचे आयडीयल एज्युकेशन ॲन्ड वेल्फेअर सोसायटीचे सर्व  पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक समीर गडबडे  पर्यवेक्षिका रईसा मुजावर, सर्व  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तीनही संघांचे अभिनंदन करून सातारा येथे  होणा-या पुढील  विभागीय स्पर्धेसाठी  शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

3205049
Share This Article