दापोली : तालुक्यातील केळशी-देवसेत येथे दापोलीकडे जाणारी एसटी बस रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चरामध्ये अडकली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
वीज वितरण कंपनीने भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठी रस्त्यालगत तीन फूट खोल चर खोदल्यामुळे अर्ध्या रस्त्यावर मातीचा ढिगारा तयार झाला आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांना जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
दापोली-केळशी दरम्यान एसटीच्या फेऱ्या दिवसभर सुरू असतात. या मार्गावरून केळशी पंचक्रोशीतील अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात. परंतु यात्र ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे प्रवास धोकादायक झाला आहे.
पावसाळ्यात हे काम हाती घेतल्याने रस्ता अधिक खराब झाला असून ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.
दापोली : केळशीत रस्त्यालगतच्या चरामध्ये एसटी अडकली
