GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : प्रभाग क्रमांक ४ मधून उच्चशिक्षित उर्मिला बाकळकर यांचे नगरसेवक पदासाठी नाव चर्चेत

Gramin Varta
372 Views

राजापूर : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मध्ये उच्च शिक्षित उर्मिला अमोल बाकळकर यांचे नाव संभाव्य नगरसेवक पदाच्या उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे.

उर्मिला बाकळकर यांनी समाजशास्त्र तसेच कृषी विषयात पदवी प्राप्त केली असून शिक्षणक्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजातील सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्या सतत कार्यरत राहिल्या आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी व विश्वास निर्माण झाला आहे.

प्रभागातील रहिवासींचे म्हणणे आहे की, गोविंद भाई बाकळकर हे पूर्वीचे नगरसेवक म्हणून  तडफदार आणि कार्यक्षम व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी प्रभागात अनेक विकासकामे केली आहेत. आता त्यांच्या सुनबाई महिला उमेदवार म्हणून उर्मिला अमोल बाकळकर यांना जर तिकीट मिळाले, तर प्रभाग क्रमांक ४ उजळून निघेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

उर्मिला बाकळकर यांचे सासरे गोविंदभाई बाकळकर हे माजी नगरसेवक असून त्यांनी वरची पेठ भागात अनेक उल्लेखनीय कामे केली होती. त्यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी उर्मिला अमोल बाकळकर यांना तिकीट मिळावे, अशी नागरिकांची मागणी वाढत आहे.

Total Visitor Counter

2648402
Share This Article