GRAMIN SEARCH BANNER

दीपावलीसाठी बीएमसी अधिकारी-कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

Gramin Varta
22 Views

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली – २०२५ प्रीत्यर्थ ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

दीपावली – २०२५ करीता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱयांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी घोषित केला आहे. त्याचा क्रम, तपशील आणि सानुग्रह अनुदान रक्कम या क्रमाने माहिती पुढीलप्रमाणेः

१. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/-

२. अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारीः रुपये ३१,०००/-

३. महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः रुपये ३१,०००/-

४. माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-

५. माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-

६. अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-

७. अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-

८. सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV): भाऊबीज भेट रुपये १४,०००/-

९. बालवाडी शिक्षिका / मदतनीस – भाऊबीज भेट रुपये ५,०००/-

Total Visitor Counter

2656144
Share This Article