GRAMIN SEARCH BANNER

लांजात दुचाकी घसरून अपघात; तरुण जखमी

लांजा: तालुक्यातील भांबेड मार्गे खोरनिनकोकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका तरुण चालकाला दुखापत झाली. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेएक वाजण्याच्या सुमारास घडली. संदेश शरद रहाटवल (वय २५, रा. खोरनिनको, ता. लांजा) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

संदेश हा रविवारी सावर्डे येथील काम आटोपून भांबेड मार्गे खोरनिनकोकडे दुचाकीने जात असताना रस्त्यावर अचानक दुचाकी घसरली आणि तो अपघातग्रस्त झाला. या अपघातात त्याला दुखापत झाली. जखमी संदेश याला प्रथम उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Total Visitor Counter

3483788
Share This Article