रत्नागिरी : पोमेंडी खुर्द येथे आंब्याच्या झाडावरून पडून तरुण गंभीर

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी : शहरानजीकच्या पोमेंडी खुर्द येथे हापूस आंब्याच्या झाडावरून पडल्याने एका तरुणाला गंभीर दुखापत झाली. सुरेशकुमार (वय २६, रा. पोमेंडी खुर्द, रत्नागिरी; मूळ रा. उत्तर प्रदेश) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

सुरेशकुमार हा रमाकांत मयेकर (रा. पोमेंडी खुर्द) यांच्याकडे मजुरीचे काम करत होता. ६ फेब्रुवारी रोजी तो हापूस आंब्याच्या झाडावर चढून फांद्या हलवत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खाली कोसळला. या अपघातात त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली.

जखमी अवस्थेत त्याला तात्काळ उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *