GRAMIN SEARCH BANNER

दापोलीतील पाळंदे बीचवर पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

Gramin Varta
180 Views

दापोली : तालुक्यातील पाळंदे बीच येथे सहकुटुंब पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील एका ४७ वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हॉटेलच्या रूममध्ये विश्रांती घेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ही घटना २८ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली असून, याप्रकरणी २९ डिसेंबर रोजी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वैभव देवराम साबळे (वय ४७, रा. प्लॅट नं. ४६४, सेक्टर २७, आयसीआयसीआय बँकेजवळ, निगडी प्राधिकरण, पुणे) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव साबळे हे आपली पत्नी दिपांजली आणि मुलीसह सुट्ट्या घालवण्यासाठी दापोली येथे आले होते. ते पाळंदे येथील ‘सनसँड बीच रिसॉर्ट’ मध्ये उतरले होते. २८ डिसेंबर रोजी फिरून आल्यानंतर ते आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले होते.

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नीने त्यांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु वैभव यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी दापोलीतील सद्गुरू रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून सायंकाळी सव्वासात वाजता मृत घोषित केले. डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Total Visitor Counter

3242968
Share This Article