GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण येथे होणार राज्यातील महिलांचे पहिले नमन २५ ऑक्टोबर रोजी

Gramin Varta
299 Views

चिपळूण: जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाने राज्यातील महिलांचे पहिले नमन रंगभूमीवर आणले आहे.चिपळूण येथे २५ ऑक्टोबर रोजी या नमनाचा प्रयोग होणार आहे.

महिलांनी केवळ चूल आणि मूल न सांभळता पुरुषाच्या बरोबरीने काम करायलाच हवे आणि म्हणूनच या मंडळाने कोकणची नमन कला हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. वय वर्षे १५ ते ७२ वयोगटातील या महिला कलाकारांनी सादर केलेले नमन हे एक शिवधनुष्य उचलल्यासारखेच आहे. आता या नमन मंडळाचा कार्यक्रम शनिवारी, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे.

लेखक-दिग्दर्शक नमनसम्राट यशवंत वाकडे, निर्माता साईनाथ नागवेकर, आभारचे अध्यक्ष विनोद हळदवणेकर, विशेष सहाय्य दादा वाडेकर, शरद गोळपकर, मदन डोर्लेकर, ( गुरूजी), वसंत घडशी सुत्रधार वासुदेव वाघे, सागर मायंगडे हे सहाय्य करत असून या नमनातील गीते सौ. सर्वता चव्हाण यांची आहेत. मुख्य गायिका सौ. आकांक्षा वायंगणकर, सौ. सर्वता चव्हाण, सौ. वेदा शेट्ये गीते गात आहेत. सौ. प्रेरणा विलणकर, ज्योती कदम, सौ. रेश्मा शिंदे, सौ. पूनम गोळपकर, सौ. अर्चना मयेकर, रेखा खातू, सौ. विनया काळप, मनस्वी साळवी, सौ. सर्वता चव्हाण, सौ. रिमा देसाई, सौ. गीता भागवत, पूर्वा चव्हाण, सौ. समीक्षा वालम, सौ. आकांक्षा वायंगणकर, सौ तन्वी नागवेकर, सौ. शीतल सकपाळ, जुई पावसकर, शोभना वरवटकर, शमिका विलणकर, सौ. वेदा प्रकाश शेट्ये, माधवी पाटील, स्वीटी पावसकर, निधी वरवटकर या भूमिका करत आहेत. नेपथ्य रचनाबावा आग्रे (लांजा) हे सांभाळत आहेत.

Total Visitor Counter

3199502
Share This Article