GRAMIN SEARCH BANNER

लांजा : हरवलेला मोबाईल परत देत समाजाला दिला आदर्श संदेश

लांजा : येथील बाजारपेठेत हरवलेला मोबाईल परत देत देवधे येथील महेंद्र महादेव गुरव (प्रभुलकर) यांनी प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला आहे.

शुक्रवारी लांजा बाजारपेठेत जान्हवी जितेंद्र गांधी (रा. डाफळेवाडी, लांजा) यांचा विवो वाय १५ मोबाईल हरवला होता. हा मोबाईल महेंद्र गुरव यांना सापडल्यानंतर त्यांनी कोणताही मोह न बाळगता थेट लांजा पोलिस ठाण्यात आणून दिला. पोलिसांनी चौकशीअंती मोबाईल मूळ मालकिणी जान्हवी गांधी यांना परत दिला.

महेंद्र गुरव यांच्या या प्रामाणिक कृतीबद्दल लांजा पोलिस ठाण्याचे निरीक्षक निळकंठ बगळे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी पोलिस अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या प्रामाणिकतेचे मनःपूर्वक कौतुक केले.

महेंद्र गुरव यांच्या या कृतीमुळे समाजात प्रामाणिकतेचा आणि जबाबदार नागरिकतेचा एक सुंदर आदर्श निर्माण झाला आहे.

Total Visitor Counter

3485608
Share This Article