GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: आर्थिक फसवणुकीतून चिपळूणातून अमीर खानला अटक

Gramin Varta
653 Views

उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई

चिपळूण: चिपळूण शहरातील काविळतळी परिसरात आज सोमवारी सकाळी घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या अमीर खान या व्यक्तीस उत्तर प्रदेश पोलिसांनी चिपळूणमधून ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमीर खान( राहणार उत्तर प्रदेश) याच्यावर उत्तर प्रदेशात आर्थिक फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल आहे. तेथील पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. मात्र त्याचा सुगावा लागत नव्हता. अखेर त्या संदर्भातील तपासासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक सोमवारी चिपळूणमध्ये दाखल झाले होते. चिपळूण पोलिसांशी चर्चेदरम्यान आमिर खान हा काविळतली येथे असल्याची माहिती उत्तरप्रदेश पोलिसांना देण्यात आली. स्थानिक चिपळूण पोलिसांच्या मदतीने उत्तरप्रदेश पोलिसांनी अमीर खानला काविळतळी येथून अटक करून ताब्यात घेतले आहे. या अचानक घडलेल्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Total Visitor Counter

3379145
Share This Article