भरणेजवळ ट्रक-दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

खेड (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील जाधव पेट्रोलपंपासमोर सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या ट्रक व दुचाकीच्या अपघातात महेश संजय गमरे (32, रा. कळंबणी) आणि सुशील भगवान तांबे (30, रा. शिरवली) हे दोघे गंभीर जखमी झाले. सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांच्या मदतीने जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

दुचाकीस्वार (एम.एच. 08 बी.व्ही. 1884) दुचाकीवरून जात असताना, भरणे येथील जाधव पंपासमोरील वळण घेत असलेल्या ट्रक (एम.एच. 08 बी.पी. 8480) ला धडक दिली. धडकेमुळे दुचाकीसह दोन्ही स्वार ट्रकाखाली ओढले गेले. दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या असून, अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *