GRAMIN SEARCH BANNER

गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी घेतली बळीराज सेनेचे पक्षप्रमुख अशोक वालम यांची भेट

Gramin Varta
208 Views

मुंबई:- बळीराज सेनेचे पक्षप्रमुख अशोक वालम यांची गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मुलुंड येथील बळीराज सेनेच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटीचे कारण समोर आले नसले तरी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दोन दिवसापूर्वी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी देवरुख येथे आम आदमी पार्टीचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ.रवींद्र जाधव यांची भेट घेतली होती.या भेटीचा फोटो गाव विकास समितीच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आला होता.तसेच ही सदिच्छा भेट म्हणजे विकासाची गॅरंटी आणि पारदर्शक कारभाराची हमी असा मजकूर या फोटोला देण्यात आला होता.

आता कोकणातील आक्रमक नेतृत्व व बळीराज सेनेचे पक्षप्रमुख अशोक वालम यांची गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मुलुंड येथील बळीराज सेनेच्या कार्यालयात भेट घेतली असून या भेटीचा फोटो गाव विकास समितीच्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. यावेळी बळीराज सेनेचे सरचिटणीस संभाजी काजरेकर,गाव विकास समितीचे नितीन गोताड,सामाजिक कार्यकर्ते दयानंद चिंचोळकर आदी उपस्थित होते अशी माहिती या पोस्ट मध्ये देण्यात आली आहे.कोकणात बळीराज सेनेचे संघटन मजबूत आहे.अशोक वालम हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.बळीराज सेना हा पक्ष आगामी निवडणुका लढवणार अशी चर्चा आहे.या पार्श्वभूमीवर या भेटी मागचे कारण स्पष्ट नसले तरी आगामी जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गाव विकास समिती संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या जागा लढविणार असल्याची घोषणा याआधीच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यातच संगमेश्वर तालुक्यात गाव विकास समिती आणि आम आदमी पार्टीच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात ग्रामीण राजकारणात काय बदल होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Total Visitor Counter

3369481
Share This Article