GRAMIN SEARCH BANNER

लांजा कोट गावचे उपसरपंच रवींद्र नारकर यांचे अल्पशा आजाराने निधन

Gramin Varta
723 Views

लांजा : तालुक्यातील कोट गावचे सुपुत्र, उपसरपंच आणि भाजपाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले रवींद्र नारकर यांचे रविवारी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळासह मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रवींद्र नारकर हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू आणि निष्ठावान कार्यकर्ते होते. स्वभावाने मनमिळाऊ व सर्वांसोबत वावरणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. भाजपासाठी त्यांनी अनेक वर्षे सक्रियपणे काम केले. विविध पक्षांतील कार्यकर्त्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

गेल्या दोन महिन्यांपासून आजारी असलेले हे युवा कार्यकर्ते अखेर आजारपणावर मात करू शकले नाहीत. त्यांच्या निधनाने कोट गावासह संपूर्ण लांजा तालुक्यात शोककळा पसरली आहे. मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशा भावना व्यक्त केल्या.

Total Visitor Counter

3366960
Share This Article