GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये जिजाऊ संस्थेतर्फे ॲम्बुलन्स सेवेला प्रारंभ

Gramin Varta
101 Views

आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आज लोकार्पण समारंभ

संदीप घाग / सावर्डे : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,रत्नागिरी विभागाच्या वतीने चिपळूण तालुक्यासाठी डिझेल दरात चालणारी ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्यात येत आहे. या सेवेचे लोकार्पण आज गुरुवार, ६ नोव्हेंबर  रोजी सकाळी १० वाजता जुना कालभैरव मंदिर आवारात करण्यात येणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असून सर्व नागरिकांना या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही सेवा जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे साहेब यांच्या स्वखर्चातून सुरू करण्यात येत आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष धिरज निलेश सांबरे, सचिव केदार चव्हाण, तसेच रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

संस्थेच्या वतीने नागरिकांना आरोग्यसेवेची तत्पर सुविधा उपलब्ध करून देणे आणि सामाजिक कार्यातून जनतेची सेवा करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे.

या सोहळ्यात जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, रत्नागिरी विभाग चिपळूण यांच्या वतीने सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3366984
Share This Article