GRAMIN SEARCH BANNER

राजापुरातील खुनाशी कोल्हापुरातील आरोपीचा अद्यापतरी संबंध नाही; तपास सुरूच,योग्य वेळी माहिती देणार : पोलिस निरीक्षक अमित यादव

Gramin Varta
1.2k Views

रत्नागिरी : कोल्हापूरच्या शाहूवाडी येथे एका जोडप्याचा खून करणाऱ्या संशयित आरोपीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर मोटारसायकल चोरी, घरफोडी, महिलांची छेडछाड, मारामारी यांसारखे विविध गुन्हे दाखल आहेत. मात्र या आरोपीचा राजापूरातील वैशाली शेट्ये खून प्रकरणाशी अद्यापतरी संबंध नाही, मात्र राजापुरातील खून प्रकरणाचा तपास सुरूच आहे, असे राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी ग्रामीण वार्ता शी बोलताना स्पष्ट केले.

यादव यांनी सांगितले की, “वैशाली शेट्ये यांच्या खुनाचा तपास सुरू असून कोल्हापूर येथे पकडण्यात आलेल्या आरोपीचा या प्रकरणात सहभाग आहे की नाही याची शक्यता अजून पडताळी जात आहे. काही शक्यता आणि धागेदोरे तपासले जात आहेत. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खुनाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आरोपीला लवकरच पकडले जाईल आणि ताब्यात घेतल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाईल.” असे सांगितले.

दरम्यान, कोल्हापूरमधील एका वृत्तपत्राने या आरोपीचा राजापुरातील खून प्रकरणाशी संबंध जोडत बातमी प्रसिद्ध केल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. मात्र या वृत्ताचे पोलिस निरीक्षक यादव यांनी खंडन केले असून, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यादव यांनी स्पष्ट केले की, “अधिकृत माहिती मिळेपर्यंत कोणतीही अप्रमाणित बातमी प्रसारित करू नये. योग्य वेळी माहिती देऊन खुनाचा उलगडा केला जाईल. तोपर्यंत सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3199514
Share This Article