GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या अथर्व गेल्येची रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड

Gramin Varta
190 Views

देवरुख: रत्नागिरी जिल्हा किशोर गट कबड्डी संघाच्या कर्णधारपदी संगमेश्वर तालुक्यातील दादासाहेब सरफरे विद्यालय शिवने-बुरंबीचा विद्यार्थी अथर्व गेल्ये याची निवड झाली आहे. ३६ व्या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी हा रत्नागिरी जिल्हा किशोर-किशोरी संघ निवडण्यात आला आहे. अथर्वच्या या निवडीबद्दल त्याचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
जिल्हा संघाची निवड नुकतीच करण्यात आली आहे आणि निवडलेला हा संघ आता राज्य अजिंक्यपद चाचणीसाठी कसून तयारी करणार आहे.

सरफरे विद्यालयाच्या अथर्वला कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि कबड्डी तालुका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. जिल्हा संघात कर्णधार अथर्व गेल्ये याच्यासह सुरज राठोड, सार्थक मोहिते, नैतिक कळंबटे, विघ्नेश आरेकर, हार्दिक गुरव, सार्थक कदम, माधव चिले, सम्राट गमरे, कार्तिक बाक्कर, विराज बडद, वृषभ माईन, पियुष कांबळी, प्रथमेश रामाणे या खेळाडूंची निवड झाली आहे. या संघाला प्रदिप शिंदे आणि विक्रम शिंदे हे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

Total Visitor Counter

3366874
Share This Article