GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत कन्झ्युमर्स शॉपीचे उद्घाटन

रत्नागिरी: ग्राहकाला एकाच ठिकाणी, अनेक वस्तू, योग्य दरात मिळण्यासाठी कन्झ्युमर्स शॉपी हे गृहोपयोगी व गृहसजावटींच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर बुधवारी सुरू झाले.ते येत्या १९ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते झाले, यावेळी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री अध्यक्ष उद्योगमित्र डॉ. प्रशांत पटवर्धन, पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रीती सुर्वे, नगरसेविका मेधा कुळकर्णी, निवेदिता कळंबटे, जागृती पिलणकर, रुक्सार खान, आफ्रीन होडेकर, पावसचे उद्योजक आनंद देसाई व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संयोजिका मीनल मोहाडीकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

या प्रदर्शनात अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. या मोठ्या कंपन्यांबरोबरच महिला व लघुउद्योजकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. पाच दिवसाच्या या कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनात हस्तकला, लहान मुलांचे कपडे, फर्निचर, किचनमध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू व कॅटरिंगमध्ये विविध डिशेस उपलब्ध आहेत.

Total Visitor Counter

3468193
Share This Article